। अहमदनगर । दि.01 जुलै 2024 । बीड, लातूर, अहमदनगर जिल्ह्यात दरोडा टाकण्याच्या तयारी असलेली सराईत गुन्हेगारांची चौघांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केली आहे. या टोळीकडून 3 लाख 35 हजार 500 रुपये किमतीच्या साधनासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
💥 विधानपरिषदेच्या जागांसाठी भाजपडून पाच नावांची घोषणा !
अमोल नवनाथ काळे (वय 23), शामुल ऊर्फ शौर्या नवनाथ काळे (वय 20, दोन्ही रा. वाकी, ता. आष्टी, जि. बीड), सतिच ऊर्फ मुन्न लायलन भोसले (वय 19) व भरत अब्दुल भोसले (वय 40, दोन्ही रा. कासारी, ता. आष्टी, जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, मोहन निकाजी भोसले (कासारी, ता. आष्टी, जि. बीड) हा पसार झाला आहे.
💥 अर्थसंकल्पातून सामाजिक उत्कर्षाचा प्रयत्न : ना.विखे
जिल्ह्यातील दरोडा ब जबरी चोरीचे गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढताना पोनि दिनेश आहेर यांना नगर-कल्याण रोडवर भाळवणीतील हॉटेल ऋषिकेश जवळ रोडचे कडेला काही संशयीत इसम अंधारात थांबून दरोडा घालण्याच्या तयारीत बसले आहेत. त्यानुसार पोलीस पथकास रवाना करण्यात आले. सदर ठिकाणी अंधारात मोटारसायकल लावून काही इसम आडोशाला बसलेले दिसले. पथकाने चोहोबाजूंनी जात अंधारात थांबलेल्या इसमांना ताब्यात प्रयत्न करताना तेथून पळुन जाऊ लागले.
💥 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा
पथकाने त्यांचा पाटलाग करत वरील चौघांना ताब्यात घेतले. सोबलेवाडी (ता. पारनेर) व चास (ता. नगर) येथील गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. या दरोडेखोरांकडून तीन मोबाईल, दोन युनिकॉर्न मोटारसायकली, लाकडी दांडके, सुती दोरी, मिरची पूड असा एकूण तीन लाख 35 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत पारनेर पो.स्टे.गु.र.नं. 486/24 भादविक 399, 402 सह आर्म अॅक्ट 4/27 प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
💥 खासदार निलेश लंके रिक्षातून थेट शरद पवारांच्या भेटीला !
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, अंमलदार बापूसाहेब फोलाणे, रविंद्र कर्डीले, अतुल लोटके, गणेश भिंगारदे, देवेंद्र शेलार, संदीप दरंदले, भाऊसाहेब काळे, रोहित मिसाळ, अमोल कोतकर, आकाश काळे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व अरुण मोरे यांनी केली आहे.
