। मुंबई । दि.01 जुलै 2024 । राज्यात होणार्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी भाजपकडून पाच नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने विधान परिषदेसाठी 5 नेत्यांची नावे जाहीर केली असून यामध्ये पंकजा मुंडे यांचं पहिलं नाव आहे.
💥 अर्थसंकल्पातून सामाजिक उत्कर्षाचा प्रयत्न : ना.विखे
भाजपाने पाच जागांच्या नावाची घोषणा केली असल्याने सर्वत्र भाजपाच्या वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामध्ये पंकजा मुंडेंसह इतर चौघांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
💥 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या 11 जागा 27 जुलै रोजी रिक्त होत आहेत. या जागा विधानसभा सदस्यांमधून भरल्या जाणार असून सध्याचं संख्याबळ पाहता भाजपच्या 5, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनचे 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी होऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
