। अहमदनगर । दि.30 जून 2024 । अश्लिल व्हिडीओ क्लीप सोशल मिडीयावर प्रसारीत करुन बदनामी करुन तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करु व तुमचे राजकीय कारकिर्द संपवुन टाकु अशी धमकी देवुन दोन महिलांसह तथाकथित पत्रकार इस्माईल दर्यानी उर्फ भैय्या बॉसरने माजी आमदारला १ कोटी रुपयाच्या खंडणीची मागणी करून २५ हजार रुपये घेतले.
👉 जिल्हा परिषदेच्या घंटागाडी खरेदीत भ्रष्टाचार!
ही घटना जानेवारी ते दि.२६ जून दरम्यान रॉयल हॉटेल, स्टेट बँक चौक, अहमदनगर व संपर्क कार्यालय, आष्टी ता. आष्टी जि. बीड येथे घडली. या प्रकरणारुन पुन्हा हनी ट्रॅपचे रॅकेट कार्यरत असल्याच्या चर्चेला उधान आले आहे. माजी आमदार यांच्या बाबत झालेल्या या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.
👉 नीट पेपरफुटीचे प्रकरण : एटीएसने घेतले दोघे ताब्यात !
या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दि.२९ रोजी रात्री गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी माजी आमदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोन महिलांसह इस्माईल दर्र्यानी उर्फ भैय्या बॉसर यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम ३८४, ३८५, ३८८, ३४ प्रमाणे खंडणीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास महिला सहायक पोलिस कोकाटे या करीत आहेत.
