शिर्डीत सव्वा लाखाचा गुटखा जप्त


| अहमदनगर |  दि.18 जुन 2024 |  शिर्डीत गुटखा विक्री करणार्‍या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून १ लाख २४ हजार ३५६ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी तीनजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

👉 स्कोडा कार चालकाने पाच जणांना उडविले

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि.१५ रोजी शिर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती काढत असतांना पोनि दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, फहाद ताहिरहसन अन्सारी व शोएब ताहिरहसन अन्सारी (रा. शिर्डी, ता. राहाता) हे दोघे त्यांचा हस्तक निकुंज केसरिया (रा. राजकोट, गुजरात) याच्या मार्फतीने महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला गुटखा पिंपळवाडी चौक येथील शंतनु पान स्टॉल या पानटपरीमध्ये विक्री करत आहे. 

👉 दोन दुचाकी वाहनाच्या अपघातात एक ठार

त्यांनी पथकास कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने पिंपळवाडी चौक, शिडी येथील पानटपरीमध्ये छापा टाकून फहाद ताहिरहसन अन्सारी (वय २६ वर्षे, रा. श्रीरामनगर, शिर्डी, ता. राहाता, मूळ रा. कोटकादर, ता. नगिणा, जि. बिजनोर, उत्तरप्रदेश) यास ताब्यात घेऊन त्याच्या शंतनु पान स्टॉल या नावाच्या पानटपरीची झडती घेता पानटपरीमध्ये गुटखा व पानमसाला असा एकुण १ लाख २४ हजार ३५६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

👉 अ‍ॅपच्या फाईलवर क्लिक करताच १ लाख ८० हजार गायब ...

त्याने सदरचा पानमसाला गुटखा व सुगंधीत तंबाखु ही निकुंज केसरिया (रा. निर्मला रोड, राजकोट, गुजरात) हा पाठवित असून सदरचा पानमसाला हा शिर्डी या ठिकाणी आणल्यानंतर शोएब ताहिरहसन अन्सारी (रा. श्रीरामनगर, शिर्डी, ता. राहाता, मूळ रा. कोटकादर, ता. नगिणा, जि. बिजनोर, उत्तरप्रदेश) हा टपरीमध्ये आणुन विक्री करत असल्याचे सांगितले. या तिघांविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२८,१८८, २७२, २७३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

👉 सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधून दरोडा टाकणारे दोघे जेरबंद!

पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोलीस अंमलदार अतुल लोटके, संतोष खैरे, फुरकान शेख, रणजित जाधव, शिवाजी ढाकणे, विशाल तनपुरे यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post