अ‍ॅपच्या फाईलवर क्लिक करताच १ लाख ८० हजार गायब; गुन्हा दाखल


| अहमदनगर |  दि.१४ जुन २०२४ | कस्टमर सपोर्ट फाईल बघण्यासाठी क्लिक केले असता ओटीपी न देता क्रेडिट कार्डवरून १ लाख ८० हजार रुपये गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अनोळखी सायबर भामट्याविरोधात सायबर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

याबाबत केशव निवृत्ती सानप (राहणार रभाजीनगर, केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्याकडे वेगवेगळ्या चार बँकांची क्रेडिट कार्ड आहेत. त्यांच्या मोबाइल नंबरवर कस्टमर सपोर्ट एपीके फाईल आली. ती पाहण्यासाठी त्यांनी क्लिक केले. त्यानंतर काही क्षणांत त्यांच्या एका बँकेच्या खात्यातून सुरुवातीला ३ हजार रुपये डेबिट झाले.
 
 
कोणताही ओटीपी न देता ही रक्कम खात्यातून गायब झाली. काही वेळानंतर उर्वरित तीन बँकांच्या खात्यांतून ओटीपी न देता पैसे गायब झाले. एकूण १ लाख ८० हजार रुपये खात्यातून गायब झाले. याबाबत केशव सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सायबर पोलिस करत आहेत.
 

Post a Comment

Previous Post Next Post