। अहमदनगर । दि.13 जुन 2024 । विंड वर्ड इंडीया लिमिटेड (पॉवरकॉन) कंपनीतील सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधून दरोडा टाकणार्या दोघांना जेरबंद करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कामगिरी केली आहे.
👉 पावसाची हजेरी ; शेतकर्यांमध्ये समाधान
दि.०६ मे रोजी विंड इंडीया लि.(पॉवरकॉन) पवनचक्की प्रकल्प खांडके शिवारात अनोळखी ५ ते ६ इसम त्यांच्या ताब्यातील दोन टेम्पो व एका मोटारसायकलीवर प्रकल्पाच्या आत येत सुरक्षारक्षक चंद्रकांत ठोंबरे याचे हातपाय बांधून ठेवले.
👉 शिवसेना शहर प्रमुखाची फसवणूक
त्यावेळी सुरक्षा रक्षकाने स्वत:ची सुटका करुन प्रकल्पाचे सुपरवायझर संभाजी पालवे यांना फोन करुन बोलावून घेतले. अनोळखी आरोपींनी सुपरवायझर व सुरक्षारक्षक यांच्याशी झटापट व मारहाण करत जवळील मेहेकरी गावात गेले. गावातील लोकांच्या मदतीने आरोपींना अडविण्याचा प्रयत्न केला असता,
👉 मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा
त्यांनी ताब्यातील एक टेम्पो, एक मोटार सायकल व चोरी केलेले विद्युतवाहक खांड सोडून पळून गेले. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३९५, ४२७ प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.
👉 वाहनाच्या धडकेत वृध्दाचा मृत्यू
या गुन्ह्यातील आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली व सोडून गेलेल्या वाहनांचे मदतीने तपास करुन आरोपींना ताब्यात घेतले. अधिक माहिती घेताना मोटार सायकल क्रमांक (एमएच १६ डीजे ७७३६) ही प्रशांत बाळू चांदणे (रा. सोनेवाडी, ता. नगर) याच्या मालकीची असल्याचे समजले.
👉 नरेंद्र मोदींनी घेतली पंतप्रधान पदाची शपथ
त्यास ताब्यात घेऊन नमुद गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता, त्याने इतर साथीदार मोबिन अन्सारी (रा. कॅम्प कैलारु, सर्जेपुरा, अहमदनगर), सुरजीत गुंजाळ, (रा. माथनी, ता. नगर), महेश पवार, (रा. निबोंडी, ता. नगर) व त्याचे दोन मित्र अशांनी मिळून केल्याचे सांगितले.
👉 सोन्याचे भाव गगणाला भिडले
गुन्ह्यातील माल हा बजरंग शाळेजवळील भंगार व्यावसायीक सागर कुकरेजा (रा. अहमदनगर) यास विक्री केल्याचे सांगितले. सुरजीत गुंजाळ (रा. माथनी, ता. नगर), महेश पवार (रा. निबोंडी, ता. नगर), सागर कुकरेजा, (रा. अहमदनगर) हे फरार झाले आहेत.
👉 शिर्डीत मशाल ; भाऊसाहेब वाकचौरेंचा विजय
ताब्यातील दोन्ही आरोपींना नगर तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४५६/२०२४ भादविक ३९५, ४२७ प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासकामी नगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.
👉 देशात परिवर्तनाची सुरूवात : शरद पवार
स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, अंमलदार भाऊसाहेब काळे, गणेश भिंगारदे, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, प्रमोद जाधव, मेघराज कोल्हे व अरुण मोरे यांनी ही कामगिरी केली आहे.
