पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकण्यासाठी खासदार निलेश लंके यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
| अहमदनगर | दि.19 जुन 2024 | राज्य सरकारच्या वतीने १९ जुनला पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून, सध्या सुरु असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर ही भरती प्रक्रिया पुढे ढकण्यासाठी खासदार नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे.
पावसामुळे सदरची चाचणी परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांनी नवनिर्वाचीत खासदार निलेश लंके यांची भेट घेऊन भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी केली होती. उमेदवारांच्या मागणीची तातडीने दखल घेत खा.लंके यांनी मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून उमेदवारांच्या अडणींकडे लक्ष वेधले आहे.
दिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, चाचणीच्या दिवशी अचानक पाऊस् सुरु होऊन भरती प्रक्रिया प्रभावीत झाल्यास त्याचा परिणाम वर्षानुवर्षे भरतीची तयारी करणार्या विद्यार्थ्यांवर होणार आहे. तसेच भरतीच्या ठिकाणी पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्यास पावसाळ्यात जंतुसंसर्ग आजार होऊन भारतीसाठी आलेले तरुण आजारी पडू शकतात.
