विक्रम करुन रेल्वे मंत्रालयानं मिळवल "लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स" मध्ये स्थान

। नवी दिल्ली ।  दि.18 जुन 2024 । रेल्वे मंत्रालयाच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे. रेल्वे मंत्रालयानं २६ फेब्रुवारी २०२४ रोजी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यामध्ये २,१४० ठिकाणी ४०,१९,५१६ लोक उपस्थित होते.

एकाच वेळी अनेक जणांना एकत्र आणण्याच्या या प्रयत्नांची जागतिक पातळीवर घेण्यात आली. या कार्यक्रमाची नोंद प्रतिष्ठेच्या ’लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये घेण्यात आली.

रेल्वे मंत्रालयानं २६ फेब्रुवारी २०२४ रोजी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. ज्यात २,१४० ठिकाणी ४०,१९,५१६ लोक उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे ओव्हर ब्रिज, अंडरपासचं उद्घाटन आणि रेल्वे स्थानकांची पायाभरणी करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आज जे काही करतोय ते अभूतपूर्व वेगानं करीत आहे. भारत आता छोटी स्वप्ने पाहत नाही, तर मोठी स्वप्नं पाहण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतोय.”

भारतात दररोज रेल्वेनं प्रवास करणार्‍यांची संख्या ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. भारतीय रेल्वेनं दररोज सुमारे ३ कोटी लोक प्रवास करतात. ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या २.७५ कोटी आहे. भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क आहे. रशिया तिसर्‍या क्रमांकावर, चीन दुसर्‍या क्रमांकावर आणि अमेरिकेचं रेल्वे नेटवर्क पहिल्या स्थानावर आहे.




Post a Comment

Previous Post Next Post