दोन दुचाकी वाहनाच्या अपघातात एक ठार

| अहमदनगर |  दि.१6 जुन २०२४ | दोन दुचाकींच्या धडकेत एका तरूणाचा मृत्यू झाला. अनिल दशरथ बर्डे (वय 31 रा. चिचोंली फाटा ता. राहुरी) असे मयत तरूणाचे नाव आहे. सदरची घटना 30 मे रोजी रात्री पावणे नऊ वाजता नगर - मनमाड रस्त्यावरील देहरे (ता. नगर) शिवारात जगताप नर्सरीजवळ घडली आहे. याप्रकरणी 13 जून रोजी दुचाकीवरील अज्ञात व्यक्तीविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दशरथ पुंजा बर्डे (वय 51 रा. चिचोंली फाटा) यांनी फिर्याद दिली आहे. अनिल बर्डे हे त्यांच्या दुचाकीवरून नगर - मनमाड रस्त्याने जात असताना रात्री पावणे नऊच्या सुमारास देहरे शिवारात जगताप नर्सरीजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून एका दुचाकीस्वाराने धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या अनिल यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर दुचाकीस्वार पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post