| नागपूर | दि.17 जुन 2024 | पुण्यातील अपघातचे प्रकरण ताजे असतानाच आता स्कोडा कार भरधाव वेगाने चालवत एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या दोन भाजी विक्रेते आणि तीन ग्राहक अशा पाच जणांना धडक देऊन जखमी केले. याघटनेने परिसरात खळबळ उडाली.
👉 दोन दुचाकी वाहनाच्या अपघातात एक ठार
यामधील तिघांची प्रकृती गंभीर आहे, ही घटना नंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी दुपारी १२.२५ च्या दरम्यान घडली आहे. दरम्यान ही कार एका भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकार्याची असल्याची माहिती पुढे येत आहे.
👉अॅपच्या फाईलवर क्लिक करताच १ लाख ८० हजार गायब
या अपघातात महेंद्र बद्रीदास अग्रवाल, वंदना महेंद्र अग्रवाल, गोलू पप्पू गुप्ता, बसंती सुंदरलाल नैताम, विक्रम राजरामसिंग भोसले, अशी या घटनेतील जमखींची नावे आहेत. यामध्ये अग्रवाल दाम्पत्य गंभीर जमखी झाल्याची माहिती समोर आली आहे.
Tags:
Breaking
