नाशिक शिक्षक मतदार संघ निवडणूक : शेवटच्या दिवशी 27 उमेदवारांचे 31 अर्ज दाखल


। अहमदनगर ।  दि.07 जुन 2024 । महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार दि. जून  रोजी  31 उमेदवारांनी 27 नामनिर्देशन पत्र सादर केले असून आत्तापर्यंत 40 उमेदवारांनी 53 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. 

👉 सोन्याचे भाव गगणाला भिडले

आज नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्यामध्ये दराडे रुपेश लक्ष्मण, नाशिक यांनी अपक्ष मधून नामनिर्देशन अर्ज सादर केला आहे. गांगुर्डे बाबासाहेब संभाजी, अहमदनगर यांनी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक सेल संघटनेतून नामनिर्देशन अर्ज सादर केला आहे. 

👉 मलईदार खात्यासाठी दबाव : शपथविधी एक दिवस उशिरा ! 

गुळवे संदिप नामदेव, अहमदनगर, अनिल शांताराम तेजा, नाशिक, कोल्हे सागर रविंद्र, नाशिक, अमोल बाळासाहेब दराडे, अहमदनगर, रखमाजी निवृत्ती भड, नाशिक, कोल्हे संदिप वसंत, नाशिक, भास्कर तानाजी भामरे, नाशिक यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे.

👉  खासदार निलेश लंके यांचे समर्थक अ‍ॅड.राहुल झावरे यांना मारहाण

धनराज देविदास विसपुते, रायगड यांनी भारतीय जनता पार्टी व अपक्षतून अर्ज सादर केला आहे. भागवत धोंडीबा गायकवाड, अहमदनगर यांनी समता पार्टीतून नामनिर्देश अर्ज सादर केला आहे. गुळवे संदिप भिमाशंकर, धुळे यांनी अपक्षतून अर्ज सादर केला आहे. पंडीत सुनिल पांडुरंग, अहमदनगर यांनी अपक्ष व भारतीय जनता पार्टीतून अर्ज सादर केला आहे.

👉  पंकजा मुंडे यांनी नगर शहरातून विधानसभा निवडणूक लढवावी : अ‍ॅड. आगरकर  

गुळवे संदीप गोपाळराव यांनी शिवसेना पक्ष (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व अपक्ष मधून अर्ज सादर केला आहे. जायभाये कुंडलिक दगडू, अहमदनगर , अविनाश महादू माळी, नंदूरबार यांनी अपक्षातून अर्ज सादर केला आहे. कचरे भाऊसाहेब नारायण, अहमदनगर यांनी इंडियन नॅशनल काँग्रेस मधून अर्ज सादर केला आहे.

👉  खासदार नीलेश लंकेंच्या विजयाचा शिवसैनिकांमधून जल्लोष

इरफान मो इसहाक, नाशिक यांनी अपक्षतून अर्ज सादर केला आहे. दिलीप बापुराव पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून अर्ज सादर केला आहे. बोठे रणजित नानासाहेब, अहमदनगर, सारांश महेंद्र भावसार,धुळे, गुरुळे संदिप वामनराव,अहमदनगर यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे. दराडे किशोर भिकाजी, नाशिक यांनी शिवसेना पक्षातून अर्ज सादर केला आहे. 

👉 देशात परिवर्तनाची सुरूवात : शरद पवार 

झगडे सचिन रमेश,अहमदनगर, महेश भिका शिरुडे, नाशिक, शेख मुख्तार अहमद यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे. दराडे किशोर प्रभाकर, नाशिक यांनी अपक्ष व राष्ट्रीय जनक्रांती पार्टीतून अर्ज सादर केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post