नरेंद्र मोदींनी घेतली पंतप्रधान पदाची शपथ


। नवीदिल्ली ।  दि.09 जुन 2024 । नरेंद्र मोदी  सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन इतिहास रचणार आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतरचे ते दुसरे नेते आहेत, जे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होत आहेत. 

👉 राज्यपालांच्या हस्ते ११५ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस पदक प्रदान 

शपथविधी सोहळ्यानिमित्त दिल्लीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याला परदेशातील अनेक पाहुणेमंडळीही उपस्थित आहेत. 

👉 फोडाफोडीच्या राजकारणाविरोधात जनमत : थोरात

राष्ट्रपती भवनात संध्याकाळी 7.15 वाजता पंतप्रधान मोदींचा शपथविधी पार पडला आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास 41 खासदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

👉  पंकजा मुंडे यांनी नगर शहरातून विधानसभा निवडणूक लढवावी : अ‍ॅड. आगरकर  

यामध्ये पहिल्यांदाच पुण्याचे खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांचाही समावेश आहे. नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पियुष गोयल, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव आणि रिपाईचे रामदास आठवले यांना संधी मिळाली आहे.

👉 खासदार नीलेश लंकेंच्या विजयाचा शिवसैनिकांमधून जल्लोष 

Post a Comment

Previous Post Next Post