खासदार निलेश लंके यांचे समर्थक अ‍ॅड.राहुल झावरे यांना मारहाण

खासदार निलेश लंके यांचे समर्थक अ‍ॅड.राहुल झावरे यांना मारहाण

अ‍ॅड.झावरे यांच्या वाहनाची तोडफोड 

। अहमदनगर ।  दि.06 जुन 2024 ।  लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पारनेरमध्ये विजयी उमेदवार खासदार निलेश लंके आणि पराभुत उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या समर्थकांध्ये चांगलाच राडा झाला.. लंके आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या समर्थकांमध्ये पारनेर बसस्थानकावर चांगलीच धुमचक्री झाली. यात लंके यांचे निष्ठावान कार्यकर्ते राहुल झावरे गंभीर जखमी झाले आहेत. 

👉 खासदार नीलेश लंकेंच्या विजयाचा शिवसैनिकांमधून जल्लोष
 

 पारनेर बसस्थानकावर भर दुपारी हा राडा झाल्याने पळापळ झाली. पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. निवडणूकीनंतर पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गटातटाचे राजकारण सुरु झाले आहे

👉 देशात परिवर्तनाची सुरूवात : शरद पवार

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नीलेश लंके आणि भाजपच्या सुजय विखे यांच्यात अटीतटीची लढाई झाली. यात लंके खासदार झाले. लोकसभेसाठी विखे यांनी लंके यांच्या होमग्राऊंडवर बरीच फोडाफोडी केली.  

👉 फोडाफोडीच्या राजकारणाविरोधात जनमत : थोरात

निवडणूकीनंतर पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गटातटाचे राजकारण सुरु झाले आहे. लंके यांच्या विजयानंतर भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. लंके यांचे समर्थक् अ‍ॅड.राहुल झावरे यांच्या गाडीवर पारनेर बस स्थानकाजवळ मोठे नुकसान झाले असून 

👉निलेश लंके विजयी : नगर दक्षिणेत तुतारी  

अ‍ॅड.झावरे यांना उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले आहे. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात रुग्णालयात नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच लंके समर्थक घटनास्थळी जमा झाले. तसेच पोलिसाांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post