। नवीदिल्ली । दि.06 जुन 2024 । लोकसभा निवडणुकीनंतर सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असून यामुळे पुन्हा एकदा खरेदीदारांच्या खिशाला कात्री बसताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सोन्या आणि चांदीच्या वायदे व्यवहारात तेजी दिसत आहे.
👉 खासदार निलेश लंके यांचे समर्थक अॅड.राहुल झावरे यांना मारहाण
सलग दुसर्या दिवशी दोन्ही मौल्यावान धातूच्या किंमती महागल्या आहेत. विशेषतः चांदीच्या दरात विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात तेजीची शक्यता आणखी तीव्र झाली आहे.
👉 देशात परिवर्तनाची सुरूवात : शरद पवार
सोन्याच्या वाडे किंमतीत सलग दुसर्या दिवशी वाढ नोंदवली गेली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज वाढून ७२ हजार ९०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला असून सकाळपासून सोन्याच्या वायदे किंमतीत वाढीसह व्यवहार होत आहेत.
👉 लग्नाच्या वर्हाडाचा टॅक्टर उलटून 15 ठार
Tags:
Maharashtra
