पंकजा मुंडे यांनी नगर शहरातून विधानसभा निवडणूक लढवावी : अ‍ॅड. आगरकर


। अहमदनगर ।  दि.06 जुन 2024 ।  भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता नव्या जोमाने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे. येणारी विधानसभा निवडणूक पंकजा मुंडे यांनी नगर शहरातून लढवावी, अशी अपेक्षा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी काढले आहे.

👉 खासदार निलेश लंके यांचे समर्थक अ‍ॅड.राहुल झावरे यांना मारहाण 

आगरकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या लोककसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना नगर शहरातून मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे नगर शहरात भारतीय जनता पार्टीसाठी पोषक वातावरण आहे. 

👉 खासदार नीलेश लंकेंच्या विजयाचा शिवसैनिकांमधून जल्लोष

येणारी विधानसभा निवडणूक जिंकण्याचा चंग शहर भारतीय जनता पक्षाने बांधला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या सारख्या संघर्षशील व लढवैय्या नेतृत्वाला जर नगर मधून विधानसभा निवडणूकीचे तिकीट दिल्यास त्या निश्चितच विजयी होतील. 

शिर्डीत मशाल ; भाऊसाहेब वाकचौरेंचा विजय

राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पक्षाच्या अध्यक्षांना पत्र पाठवून पंकजा मुंडे यांना नगरमधून तिकीट देण्याची मागणी केली असल्याचे पत्रक भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर यांनी काढले आहे.

👉 देशात परिवर्तनाची सुरूवात : शरद पवार

भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी येणारी विधानसभा निवडणूक नगर शहरातून लढवावी अशी साद घालणारे पत्रक अॅड. अभय आगरकर यांनी काढले आहे. हे पत्रक त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंदीय गृहमंत्री अमित शहा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवले आहे.

👉 फोडाफोडीच्या राजकारणाविरोधात जनमत : थोरात

पत्रकात अॅड. अभय आगरकर पुढे म्हणाले आहेत, लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांनी कायम नगर शहरावर प्रेम केले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी नगर शहराचा पाणी प्रश्न सोडवण्या बरोबरच शहरातील गुंडगिरीलाही लगाम त्याकाळात घातला होता. 

👉 बुलेट चोरणारी टोळी जेरबंद ; मोटारसायकली हस्तगत

त्यांचा कामाचा वारसा पंकजा मुंडे या पुढे नेत आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी नगर शहरातून विधानसभा निवडणूक लढवावी, अशी आमची  पक्षश्रेष्ठींकडे मागणी आहे. 

👉 पुणे पोर्शे कार अपघातात आरोपीच्या आईला अटक

Post a Comment

Previous Post Next Post