। अहमदनगर । दि.05 जुन 2024 । अहमदनगर लोकसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीत अखेर नीलेश लंके यांनी बाजी मारली. एकीकडे प्रशासकीय आकडेवारी येण्यास उशीर होत असला तरी कार्यकर्त्यांच्या यंत्रणेची आकडेवारी आधी बाहेर येत होती.
निलेश लंके विजयी : नगर दक्षिणेत तुतारी
सुरवातीपासून आघाडीवर असलेले डॉ.सुजय राधाकृष्ण विखे पाटील दुपारनंतर पिछाडीवर पडल्याने लंकेंच्या कार्यकर्त्यांनी सर्वत्र जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली.
देशात परिवर्तनाची सुरूवात : शरद पवार
लंके यांच्या विजयाने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाने नेता सुभाष चौकात एकमेकांना पेढे भरवत, फटाक्याची मोठी आतिषबाजी केली. तसेच चौका चौकात ढोल ताशांचा आवाज घुमला होता. तर भगव्या गुलालाची उधळ करत आंनोदोत्सव साजरा करण्यात आला.
Tags:
Breaking
