। नवी दिल्ली । दि.06 जुन 2024 । लोकसभा निवडणुकीत २०१४ नंतर पहिल्यांदाच भाजपला बहुमत मिळालेले नाही. अशा परिस्थितीत सरकार स्थापनेसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये समाविष्ट असलेल्या पक्षांवर भाजपचे अवलंबित्व वाढले आहे. ठराविक खाती पदरात पाडून घेण्यासाठी मित्रपक्षांनी भाजपवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, मोदी यांचा शपथविधी एक दिवस उशिरा म्हणजे रविवारी होणार आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल, माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगु देसम पक्ष तसेच महाराष्ट्रात भाजपला कमी जागा मिळाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना या पक्षांनी दबावतंत्र सुरू केल्याने भाजपच्या चिंता वाढल्या आहेत. अग्निवीर योजनेबाबत पुन्हा एकदा विचार करण्याची गरज असल्याचे संयुक्त जनता दलाने म्हटले आहे.
समान नागरी संहिता लागू करण्यापूर्वी सर्व राज्यांशी बोलणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. संयुक्त जनता दल आणि लोकजनशक्ती या पक्षांनी रेल्वे खात्यासाठी आग्रह धरला आहे. तेलुगु देसमला केंद्रात अनेक महत्त्वाची मंत्रालये हवी आहेत. लोकसभा अध्यक्षपदाची मागणी करण्यात आली आहे; परंतु भाजप त्याला तयार नाही.
संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते केसी त्यागी म्हणाले, की अग्नवीर योजनेला खूप विरोध झाला होता. त्याचा परिणाम निवडणुकीतही दिसून आला. अशा परिस्थितीत या योजनेचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. समान नागरी कायद्याबाबत
