मराठा समाज आक्रमक...बारस्कर याच्यावर कारवाईची मागणी

 


। अहमदनगर  । दि.22 फेब्रुवारी 2024 । अजय महाराज बारसकर यांच्यावर खंडणीचे गंभीर आरोप झालेले आहेत. खंड्या उर्फ अजय बारसकर हे सुरवातीला खाकी कपडे घालून गाड्या लुटण्याचे काम करत होते. तसेच एका लहान मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे आणि भिशी चालवण्याचे काम करत असताना भिशीचे पैसे घेऊन पळून गेलेले आहेत,  असा आरोप अहमदनगर मराठा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

👉  मराठा समाज आक्रमक...२४ फेब्रुवारीपासून आंदोलन तीव्र...

अहमदनगर मराठा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत अजय बारसकर यांनी जे मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले ते फेटाळून लावत बारसकर यांचा चांगलाच समाचार घेतला. अ‍ॅड.गजेंद्र दांगट, निलेश सुंबे, विशाल घोलप, गोरख दळवी, स्वप्नील दगडे, मिलिंद जपे, गणेश भोसले, विक्रांत दिघे, गिरीष भांबरे, अभय शेंडगे, परमेश्वर पाटील, सव्वाशे भाग्येश, अमोल पवार, सिंध्दात पानसरे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मराठा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा समाज मनोज जरांगे यांच्यामागे उभा राहणार असल्याचे व पुढील ठरलेल्या आंदोलनाच्या दिशेत सहभागी असल्याचे जाहीर केले

👉  भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा....

मराठा समाजाचे जेव्हापासून आंदोलन सुरू झाले तेव्हापासूनच त्यांनी वेगळी भूमिका घेतल्याने दोन महिन्यापूर्वीच अहमदनगरच्या मराठा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी अजय बारसकर यांना बाहेर काढले होते असे संगत कोणतेही उत्पन्नाचे साधन नसताना जमिनी घेतल्या त्याचा पैसा कसा आला याची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 

👉  वडील रागवल्याने 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता

मागील आठवड्यात खंडू उर्फ अजय बारस्कर हा कोणत्या तरी मोठ्या नेत्यांच्या बरोबर हवाई सफर करून आला आणि त्यानंतर त्याने बोलायला सुरुवात केली. मराठा आंदोलन थांबवण्यात सरकारला अपयश आल्याने फूट पाडून आंदोलन भरकटवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप या वेळी पत्रकार परिषदेत करण्यात आला.

👉 मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिवेशनात मांडणार : आ. संग्राम जगताप  

Post a Comment

Previous Post Next Post