भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा....


।  कोल्हापूर । दि.21 फेब्रुवारी 2024 ।  सध्या देशात 'भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा' अशी स्थिती आहे, अशा शब्दात शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.

कोल्हापुरात गोविंद पानसरे यांच्या स्मारकाचे लोकापर्ण ज्येष्ठ नेते शरद पवार, शाहू छत्रपती, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सतेज पाटील यांनी उपस्थिती लावली.

कोल्हापूरच्या प्रतिभानगर येथे स्मारक उभारण्या.त आले आहे. या कार्यक्रमावेळी शरद पवारांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर  टीका केली.

गोविंद पानसरे यांच्यावर हल्याच्या माध्यमातून पुरोगामी विचार नष्ट करू असा प्रयत्न काही प्रवृत्तीने केला. ज्यांच्याकडे विचार नाही. अशी प्रवृत्ती कायदा हातात घेऊन अशी कृती करत गेली. आज प्रतिगामी शक्ती वाढत आहे

देशाच्या सर्वोच्च सभागृहाचे अधिवेशन असताना पंतप्रधान अधिवेशनासाठी फक्त वीस मिनिटं संसदेत आले. सत्तेचा गैरवापर सध्या सुरू आहे. प्रतिगामी शक्तींना दूर ठेवणे हीच पानसरेंना श्रद्धांजली ठरणार आहे. देशातील भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा अशी स्थिती सध्या आहे.

---

👉 पारनेरमध्ये नगरसेवक पठारे यांच्यावर भरदिवसा गोळीबार… 

👉  ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंची तोफ अहमदनगर शहरात धडाडणार

👉  मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिवेशनात मांडणार : आ. संग्राम जगताप  

Post a Comment

Previous Post Next Post