मावळा, राजमाता जिजाऊ प्रतिष्ठाणचा उपक्रम कौतुकास्पद : आ.संग्राम जगताप


। अहमदनगर  । दि.22 फेब्रुवारी 2024 । छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून मावळा प्रतिष्ठाण व राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानने महिलांसाठी नाष्टा सेंटर गाड्यांचे वाटप केले. हा आगळा-वेगहा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे.

👉 मराठा समाज आक्रमक...२४ फेब्रुवारीपासून आंदोलन तीव्र... 

मावळा प्रतिष्ठानतर्फे शिवजन्मोत्सव दिल्लीगेट येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार संग्राम जगताप, साईदिप हॉस्पिटलेचे मुख्य डॉ.एस.एस.दिपक, तहसीलदार संजय शिंदे यांच्या हस्ते जयश्री हिंगे यांना प्रतिनिधिक स्वरुपात नाष्टा गाडीचे वाटप केले. 

👉 भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा.... 

यावेळी राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष व उद्योजक संजय चव्हाण, मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश म्हसे पाटील, उद्योजक राजेंद्र ससे, सारंग पंधाडे, अजय दिघे, डॉ.अविनाश मोरे, सचिजन जगातप, दत्ता साठे, अक्षय उमाप, प्रकाश वाघमारे, पप्पू गिते, प्रकाश वाघमारे, संदीप थोरात, उदय अनभुले, बापुराजे भोसले, आनंद किलोर, हेमंत मुळे, पत्रकार विजय म्हस्के, सतीष इंगळे, अश्विन खुडे आदी उपस्थित होते.

👉 ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंची तोफ अहमदनगर शहरात धडाडणार 

आमदार जगातप म्हणाले की, 19 फेब्रुवारीला शिवजयंती घराघरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. गेल्या दहा वर्षापासून मावळा प्रतिष्ठाण सामाजिक बांधिलकी म्हणून विविध उपक्रम राबवित आहेत. त्या जोडीला राजमाता जिजाऊ प्रतिष्इाण ने देखील एकल महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या उद्देशाने नाष्टा सेंटर गाड्याचे वाटप करुन त्यांना रोजगाराचे साधन उपलबध करुन दिले आहे. मावठा प्रतिष्ठानने आजपर्यंत विविध विकासात्मक काम केले आहे. 

👉 गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या पर्स मधून मोबाईल सह रोकड पळवली 

Post a Comment

Previous Post Next Post