। अहमदनगर । दि.11 फेब्रुवारी 2024 । मराठा आरक्षण प्रश्न अधिवेशनात मांडणार आहे, असे आश्वासन आमदार संग्राम जगताप यांनी दिले. यामुळे जगताप यांचे मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्या प्रमाणे मराठा आरक्षण या विषयावर 15 फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलवले आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत सगळे सोयरे या शब्दाच्या व्याख्याबाबत जी अधिसूचना काढलेली आहे.
भुजबळांचा बोलविता धनी वेगळाच : सकल मराठा समाजाचा आरोप
ती लागू करून घटनेत पारित करावी यासाठी आपण अधिवेशनामध्ये आवाज उठवावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज अहमदनगर यांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांना निवेदनाद्वारे केली.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी घेतलेली जाहीर शपथ पूर्ण करणार : मुख्यमंत्री
यावेळी गजेंद्र दांगट, राम जरांगे, विलास तळेकर, अभय शेंडगे, महेश घावटे, रावसाहेब काळे, दत्ता वामन,गिरीश भामरे, सुधीर दुसुंगे, अशोक डम, परमेश्वर पाटील, संदीप जगताप, सोमनाथ गुंड, संचित निकम, बाबासाहेब रोहोकले आदी उपस्थित होते.
मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेत जिल्ह्यातील सर्व मराठा बांधव होणार सामील
यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभेत प्रश्न मांडणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी समाज बांधवांनी संग्राम जगताप यांचे अभिनंदन केले. जगताप यांनी जाहीर केला. जिल्ह्यातील इतर आमदार पाठिंबा देतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
