। जालना । दि.22 फेब्रुवारी 2024 । राज्य सरकारने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. परंतु, आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण हवंय, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे.
जरांगे अंतरवाली सराटी गावात बुधवारी (ता. २१) मराठा समाजाची बैठक बोलावली होती. या बैठकीत मराठा आरक्षणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यानंतर जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
२४ फेब्रुवारीपासून दररोज राज्यातील प्रत्येक गावात एकाचवेळी रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असे जरांगे यांनी जाहीर केले आहे. मागण्या मान्य करण्याबाबत त्यांनी सरकारला २२ व २३ फेब्रुवारी या दोन दिवसांची मुदत दिली.
सरकारने लवकरात लवकर सगेसोयरे अध्यादेशाचे लवकरात लवकर कायद्यात रुपांतर करा अन्यथा मोठे आंदोलन करू, असा इशाराच जरांगे यांनी दिला आहे
