वडील रागवल्याने 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता
। अहमदनगर । दि.14 फेब्रुवारी 2024 । वडील रागावल्याच्या कारणातून पंधरा वर्षीय मुलगी कोणाला काही एक न सांगता घरातून निघून गेली. तिचा शहरात सर्वत्र शोध परंतू ती कोठेही मिळून आली नाही.
👉शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून आ.शंकरराव गडाख यांचे कौतुक
या बाबतची माहिती अशी की 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटुंबासह मोरया मंगल कार्यालय परिसरात राहते.दि.११ रोजी दुपारी दीडच्या सुमारास मुलीचे वडील कामावरून जेवण करण्यासाठी घरी गेले.
👉जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत मराठा क्रांती मोर्चाचे 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंद आंदोलन
त्यावेळी त्यांनी त्यांच्या पंधरा वर्षीय मुलीस घरगुती काम सांगितले असता तिने नकार दिला. त्यामुळे वडील तिच्यावर रागवले. यानंतर रागातून मुलगी घरातून अडीच च्या सुमारास वडिलांसमोर घराबाहेर पडली. ती परत न आल्याने तिची शोधाशोध केली. परंतु ती आढळून आली नाही.
👉 मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिवेशनात मांडणार : आ. संग्राम जगताप
याबाबत मुलीच्या वडिलांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद केली. बेपत्ता मुलीचे वर्णन असे की वय १५ वर्षे, ११ महिने, रंग निमगोरा, उंची ५ फूट ५ इंच, केस सरळ, उजव्या भुवईच्या जवळ काळ्या रंगाचा तीळ, शरीराने सडपातळ, अंगावर निळा टी शर्ट व पट्ट्याचा पायजमा असे आहे.
