। अहमदनगर । दि.04 फेब्रुवारी 2024 । भारतीय सैन्य दलाचा नविन कॉम्बॅट बनावट गणवेश तयार करुन त्याची खुल्या बाजारात विक्री करणार्या नाशिक येथील एकास नगर जामखेड रोडवरील सी एस डी कॅन्टीन जवळ मुद्देमालासह अटक केली. ही कारवाई भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन व दक्षिण कमान मिलेट्री इंन्टेलिजेन्स, पुणे यांनी संयुक्तपणें केली.
👉 भुजबळांचा बोलविता धनी वेगळाच : सकल मराठा समाजाचा आरोप
या बातमीची माहिती अशी की अशी की, दि.2 रोजी दक्षिण कमान मिलेट्री इंन्टेलिजेन्स, पुणे यांना गुप्तबातमीदाराकडुन माहिती मिळाली की, सीएसडी कॅन्टीन,जामखेड रोड, अहमदनगर येथे इसम सुरेश खत्री हा इनोव्हा कार ( क्रमांक एम एच 15 डी एल 7117) मध्ये येवुन विनापरवाना नविन प्रकारचा कॉम्बैट बनावट आर्मी युनिफॉर्मची (गणवेशाची) विक्री करतो आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी प्राप्त माहिती पोलीस अधिक्षक राकेश ओला यांना कळविली.
👉 अल्पवयीन युवकाची तीन लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
त्या बाबत नगर जिल्हा तसेच लगतचा औरंगाबाद व पुणे जिल्हा सैन्य दलाचे दृष्टीने अतिशय महत्वाचे व संवेदनशिल ठिकाणे असल्याने अशा प्रकारे कोणी सैन्य दलातील बनावट युनिफॉर्मचा वापर करुन संबंधीत सैन्य विभागाचे प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करुन अनुचित प्रकार किंवा घातपात करण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. या घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक यांनी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन व दक्षिण कमान मिलेट्री इंन्टेलिजेन्सचे अधिकारी याना बरोबर घेवुन त्या ठिकाणी जावुन संशयीताची खात्री करुन कायदेशिर कारवाई करणे बाबतचे आदेशित केले.
👉वाहतुकीचे नियम पाळून आपले सुरक्षित जीवन सुरक्षित बनवा : पो नि मोरेश्वर पेन्दाम
या आदेशान्वये पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दि.2 रोजी सीएसडी कॅन्टीन, जामखेड रोड, अहमदनगर येथे जावुन पहाणी केली असता एक इसम इनोव्हा कार जवळ उभा असलेला दिसला त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पथकाने त्यास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीतास त्याचे नाव गव विचारले असता त्याने त्याचे नाव सुरेश प्रितमदास खत्री (वय 49, रा. गंगा निवास, आनंद रोड, देवळाली कॅम्प, जिल्हा नाशिक) असे सांगितले.
👉 नाशिकच्या विशेष महानिरीक्षपदी दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती
त्याचे ताब्यातील इनोव्हा कारची झडती घेता त्याचे कारमध्ये सैन दलाचे 40 युनिफॉर्म मिळुन आल्याने युनिफार्म बाबत अधिक विचारपुस करता त्याने सैनदलातील अधिका अधिकार्यांच्या नविन कॉम्बॅट युनिफॉर्म विक्री करता आणल्याचे सांगितले. त्याचेकडे सैन्यदलाचा युनिफॉर्म विक्री करणे बाबतचा परवान्याची विचारणा केली असता त्याने कोणताही परवाना नसल्याचे सांगितल्याने आरोपीस सैन दलाचे 40 बनावट नवीन कॉम्बॅट युनिफॉर्म मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भा दवि क 171 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यता आला असुन पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करत आहे.
