नाशिकच्या विशेष महानिरीक्षपदी दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती


। अहमदनगर । दि.01 फेब्रुवारी 2024 ।  नाशिक परिक्षेत्रच्या विशेष पोलिस महानिरीक्षकदी दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाण्याच्या सहाय्यक शहर आयुक्त पदावरून दत्तात्रय कराळे यांची नाशिकला बदली झाली आहे. तर बी.बी शेखर यांना तुर्त नियुक्ती देण्यात आली नाही. दत्तात्रय कराळे यांनी सन 2000-1 या कार्यकाळात नगर शहर उपअधीक्षक पदावर कामाकाज केल्याने त्यांना नगर जिल्ह्याचा चांगला अभ्यास आहे.

दरम्यान श्रीरामपुरच्या अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांची संभाजीनगर येथे रेल्वेच्या पोलिस अधीक्षकपदी बदली झाली असून या ठिकाणी लातुर येथून पोलिस प्रशिक्षण केंद्रातील अधीक्षक वैभव कलुबर्मे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर शिर्डीच्या पोंलिस उपअधीक्षकपदी गडचिरोलीच्या धानोरा येथील उपअधीक्षक शिरीष वमने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर शिर्डी येथील उपअधीक्षक संदीप मिटके यांना मात्र सध्या नियुक्तीचे ठिकाण देण्यात आले नसून त्यांच्या नियुक्तीचा आदेशही लवकरच निघणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post