नगरमध्ये भीषण आग; जीवितहानी टळली !


। अहमदनगर । दि.06फेब्रुवारी 2024 ।   नगर मनमाड रोडवरील साई मिडास या इमारतीतील वरच्या मजल्यावरील फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला मंगळवारी (दि.06) सकाळी आग लागली. महानगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने काही वेळानंतर ही आग आटोक्यात आणून विझवली. नगर-मनमाड रोडवरील साई मिडास (डौले हॉस्पिटल चौक) या इमारतीमध्ये बँका, पतसंस्था, सोन्या-चांदीचे दुकाने, दवाखाना तसेच फायनान्स कंपनीची कार्यालये आहेत. या इमारतीच्या सवारत वरच्या मजल्यावर फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे.

👉 लष्कराचा बनावट गणवेश विक्री करणार्‍यास अटक

या कार्यालयाच्या शेजारीच एक डोळ्यांचा दवाखाना आहे. या कार्यालयाच्या बाहेरच्या बाजूने सकाळी साडेनऊच्या  सुमारास थोडी आग लागल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. मात्र, काही क्षणातच ही आग भडकली आणि आगीसोबत मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर पडू लागला. ही बाब स्थानिक नगरसेवकांना नागरिकांनी कळवली. त्यानंतर तेथे नगरसेवक व राष्ट्रवादीचे शहर जिल्हा अध्यक्ष संपत बारस्कर, अजिंक्य बोरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

👉 भुजबळांचा बोलविता धनी वेगळाच : सकल मराठा समाजाचा आरोप

महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला कळविले. अग्निशमन विभाग तत्काळ दाखल झाले. पाण्याच्या फवार्‍याने ही आग विझवण्यात यश आले. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. मात्र, इमारतीवरील काही फर्निचरचा भाग कोसळला आहे. त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

👉अल्पवयीन युवकाची तीन लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक 

शहरात या अगोदरही व्यापारी संकुलांमध्ये आगीच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाने अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठी आता उपयायोजना म्हणून सर्वच इमारतीच्या वीज यंत्रणेचे आॅडिट करणे गरजेचे आहे. अन्यथा अशा घटना घडतच राहतील, अशेी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.

Post a Comment

Previous Post Next Post