। अहमदनगर । दि.04 फेब्रुवारी 2024 । रस्त्याने वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करुन स्वतःच्या व इतरांनाच्या सूरक्षेस जपावे असे प्रतिपादन शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी केले.
जिल्ह्यात 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा होत आहे त्या निमित्त अहमदनगर महाविद्यालयात 17 बटालियन एन सी सी च्या कॅडेट समोर वाहतूक नियम व सुरक्षेबाबत मार्गदर्शन करताना पोलिस निरीक्षक पेंदाम बोलत होते.
या वेळी अहमदनगर महाविद्यालयाचे प्रिन्सिपॉल डॉ. आर जे बार्बनस, व्हाईस चेअरमन डॉ पार्गे सर , डॉक्टर भालसिंग डॉक्टर रज्जाक गायकवाड सर, एन सी सी चे कमांडर जाधव सर, शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक पेंदाम, पोलिस उप निरीक्षक शमुवेल गायकवाड, सहाय्यक फौजदार शिंदे यांसह एनसीसी चे 75 ते 80 विद्यार्थी आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना पो. नि. पेंदाम म्हणाले की वाहतुकीचे नियमांचे काटेकोरपणें पालन जेव्हा होईल तेव्हाच वाहनधारकाच्या जीवनाचे रक्षण होईल. त्यासाठी वाहन चालकानी काही गोष्टी अंगीकाराव्यात. यात वाहनाच्या वेगाला आवर घालावा, वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळावा. दारु पिऊन वाहन चालवू नये, सिट बेल्ट चा वापर करावा, विना नंबरचे वाहन चालवू नये. आपल्या व इतरांच्या जीविताची काळजी घ्यावी.या साठी वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन केले.
जर वाहतूक नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक तसेच न्यायालयीन कारवाईस सामोरे जावे लागेल. यात विना लायसन्स गाडी चालवणे 5 हजार रुपये दंड,18 वर्षा खालील मुलांनी वाहन चालवणे 5 हजार रुपये दंड, विना हेल्मेट मोटारसायकल चालवणे 500 रुपये दंड, मोटारसायकल वर ट्रिपल सिट बसणे 1 हजार रुपये दंड, वाहनांवर फॅन्सी नंबरप्लेट लावणे एक हजार रुपये दंड, दारु पिऊन गाडी चालवणे कोर्टात केस दाखल होते. तरी या नियमांचे पालन आवश्य करावे.असे पेंदाम यांनी आवर्जून सांगितले.
या वेळी उपस्थित मान्यवरांच्या शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी उपस्थिताच्या शंकेचे पेंदाम यांनी निरसन केले. या कार्यक्रमानंतर शहर वाहतूक शाखेने चांदणी चौक येथे एनसीसीच्या विद्यार्थ्यांना लायसन्स तपासणी सीट बिल लावणे. वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाईचे प्रात्यक्षिक दाखवले.
