भुजबळांचा बोलविता धनी वेगळाच : सकल मराठा समाजाचा आरोप


। अहमदनगर । दि.04 फेब्रुवारी 2024 । राज्यभरात अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रवर्गाचे प्रमाणपत्र असून ते ओबीसी आरक्षणाच्या लाभदेखील घेतात. या नेत्यांना विरोध करण्याची तसेच त्यांच्या विरोधात बोलण्याची धमक मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये आहे का ? केवळ गोरगरिब आणि गरजवंत मराठा समाजाला विरोध करुन ते ओबीसी-मराठा समाजात वाद लावण्याचे उद्योग करीत आहेत. भुजबळांचा बोलतीता धनी वेगळाच असल्याचा आरोपही करण्यात आला त्यामुळे सरकारने भुजबळ यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे. 

👉 वाहतुकीचे नियम पाळून आपले सुरक्षित जीवन सुरक्षित बनवा : पो नि मोरेश्वर पेन्दाम

मंत्री भुजबळ राज्य शासनाच्या पैशातून ओबीसी एल्गार मेळावे घेऊन मराठा समाजाचा द्वेष करीत भाषणे ठोकत फिरत आहेत. शनिवारी नगर येथे त्यांनी थेट मराठा समाजावर टीका केली. त्यामुळे नगर येथील सकल मराठा समाजाचे अ‍ॅड गजेंद्र दांगट, गोरख दळवी, राम जरांगे, गिरीश भांबरे, स्वप्निल दगडे, मिलिंद जपे, परमेश्वर पाटील, किशोर शिंदे, शशिकांत भांबरे, अभय शेंडगे, किरण दंडवते, दत्तात्रेय वाबळे, महेश घावटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

👉 लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभमीवर आता महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या

नगरच्या ओबीसी एल्गार मेळाव्यात मंत्री भुजबळ यांच्यासह इतरांनी मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. गावखेड्यातील बाराबलुतेदार समाज कालही आणि आजही मराठा समाजासोबत गुण्यागोविंदाने राहत असतात भुजबळ आणि त्यांनी जमा केलेले लोक गावागावांत केवळ दोन सामाजात वाद लावण्याचे उद्योग करीत फिरत आहेत. असा आरोप सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी केला.

👉नाशिकच्या विशेष महानिरीक्षपदी दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती

मराठा समाज आजच नव्हे तर पूर्वीपासून कुणबी प्रमाणपत्रे घेत आला आहे. मंत्री भुजबळ मेळाव्यातून केवळ ओबीसी समाजाची दिशाभूल करत आहेत. मात्र गरजवंत, गरीब मराठ्यांना विरोध करुन मराठा समाजाला टार्गेट करत आहेत. मंत्रिपदाची शपथ घेताना कोणत्याही जात, धर्माचा द्वेष करणार नाही, असे सांगणारे भुजबळ संविधानाची भाषा बोलत नाहीत. त्यामुळे सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post