मराठा आरक्षणासाठी 20 फेब्रुवारीला विधिमंडळाचे विशेष अधिवेशन

। मुंबई  । दि.14 फेब्रुवारी 2024 । मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषणावर बसले आहेत. जरांगे यांची प्रकृती बुधवारी खालावली असून त्यांनी उपचार घेण्यासही नकार दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी राज्य सरकारने मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी 20 फेब्रुवारी रोजी मुंबईत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र कायदा करण्यात येणार आहे.

पुढील आठवड्यात विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या निर्णयावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य मागासवर्ग आयोगाला मराठा सर्वेक्षण अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर झाला नाही. 

पण उद्या, गुरुवारी हा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर होईल असे सांगण्यात येते. मागासवर्ग आयोगाच्या सर्वोक्षणाच्या आधारे मराठा आरक्षणासाठी नवीन कायदा तयार करण्यात येणार आहे. या अधिवेशनात आरक्षणाबाबतचे विधेयक मांडण्यात येणार आहे. त्यानंतर मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post