जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत मराठा क्रांती मोर्चाचे 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंद आंदोलन


। अहमदनगर । दि.12 फेब्रुवारी 2024 । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करण्यास संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून दिनांक १४ फेब्रुवारी रोजी सकल मराठा समाज, आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंद आंदोलन करण्यात येणार आहे. असे निवेदन पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दिनांक १० फेब्रुवारी रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. सर्व सामान्य मराठा समाज आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढून सरकारला आरक्षणाची मागणी करत आहे. सरकारला वेळ देऊन सुद्धा सरकार वेळकाढूपणा करत आहे. उ‌द्या जर जरांगे पाटील यांच्या जीवाचे काही बरे-वाईट झाले तर, महाराष्ट्रात उद्रेक होईल याची सरकारने गांभीर्याने दाखल घ्यावी. असे निवेदनात म्हटले आहे.

जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणून सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून अहमदनगर शहरासह संपूर्ण जिल्हा बंद पुकारण्यात येत आहे. असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती माहितीसाठी कोतवाली पोलिस ठाणे, तोफखाना पोलिस ठाणे, भिंगार कॅम्प पोलिस ठाणे, नगर तालुका पोलिस ठाणे, एमआयडीसी पोलिस ठाणे यांच्या प्रभारी पोलिस अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post