रेल्वे धडकेत तरुणाचा मृत्यू


। अहमदनगर । दि.09 फेब्रुवारी 2024 । नगर- दौंड रेल्वे मार्गावर अकोळनेर (ता. नगर) गावच्या शिवारात रेल्वे गाडीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. 6) पहाटे घडली. देविदास भानुदास मेहेत्रे (रा. जाधववाडी, अकोळनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. देविदास हा टँकर चालक होता, तो अविवाहित होता. त्याचा सोमवारी (दि.5) वाढदिवस होता. 

👉 लिंगनिदान प्रतिबंध कायद्याची कठोर अंमलबजावणी करा : सालीमठ 

रात्री त्याने मित्रांसमवेत वाढदिवसही साजरा केला. त्यानंतर रात्री अकोळनेर शिवारात भारत पेट्रोलियम डेपोच्या जवळील रेल्वेलाईनचे कडेला तो गंभीर जखमी अवस्थेत मिळून आल्याने त्यास खासगी रूग्णवाहिका चालक अक्षय दशरथ पाचारणे यांनी पहाटे 4.40 च्या सुमारास येथील जिल्हा
शासकीय रुग्णालयात औषधोपचाराकरिता दाखल केले असता 

👉 राष्ट्रवादी पक्ष-चिन्ह अजित पवारांचा ; निवडणूक आयोगाचा निर्णय  

तो औषधोपचारपुर्वीच मयत झाल्याचे मेडीकल ऑफिसर डॉ. कोल्हे यांनी घोषित केले. याबाबतची माहिती जिल्हा रूग्णालयातील दवाखाना डयूटीवर असलेले तोफखाना पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार जठार यांनी नगर तालुका पोलिसांना दिली. तालुका पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

👉 लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभमीवर आता महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या  

Post a Comment

Previous Post Next Post