जिल्ह्यातील दहा पोलीस निरीक्षकांची बदली!

जिल्ह्यातील दहा पोलीस निरीक्षकांची बदली !

| कोतवाली, तोफखाना पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचा समावेश

। अहमदनगर । दि.14 जानेवारी । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आले आहेत. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी. जी. शेखर पाटील यांनी त्याबाबतचे फर्मान काढले आहे. दरम्यान, जिल्ह्यात सध्या नियुक्तीस असलेल्या तीन पोलीस अधिकाऱ्यांना अकार्यकारी पदावर जिल्ह्यातच ठेवण्यात येणार आहे. 

हे वाचा...श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठानेसाठी अण्णांना निमंत्रण 

दहा पोलीस अधिकारी बदलून जाणार असून तर नव्याने नऊ अधिकारी जिल्ह्याला मिळणार आहेत. बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव, तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांचा समावेश आहे. पोनि यादव यांची धुळे तर पोनि साळवे यांची जळगावला बदली करण्यात आली आहे.

हे वाचा...मराठा आंदोलन आता आझाद मैदानावर 

निवडणूक आयोग व पोलीस महासंचालक यांच्या निर्देशानुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत. डॉ बी.जी. शेखर यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस आस्थापना विभागाची बैठक झाली. या बैठकीत अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर चर्चा झाली. त्यानंतर नाशिक परिक्षेत्रातील 28 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये नगर जिल्ह्यातील दहा पोलीस निरीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली देण्यात आली आहे. 

हे वाचा...स्वराज्याचे स्वप्न जिजाऊंनी अहमदनगर मध्येच पाहिले : इंजि. वाघ 

तर तीन पोलीस निरीक्षक अकार्यकारी पदावर राहणार आहेत. जिल्ह्यातील वर्ष व त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या अधिकाऱ्यांची माहिती राज्य निवडणूक आयोग व पोलीस महासंचालक कार्यालयाने मागविली होती. कोरोना महामारीमुळे बरेच अधिकारी जिल्ह्यातच होते. काही अधिकाऱ्यांचा कार्यकाळ तीन- चार वर्षांपेक्षा अधिक झाला आहे. मागील दोन महिन्यांपासून बदलीपात्र अधिकाऱ्यांची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती. अलीकडच्या पंधरा दिवसात वरिष्ठ पातळीवर मोठ्या हालचाली सुरू झाल्या होत्या. अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे आता या चर्चांना विराम मिळाला आहे.

हे वाचा...मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेत जिल्ह्यातील सर्व मराठा बांधव होणार सामील 

जिल्ह्यातून बदलून गेलेल्या अधिकाऱ्यांची नावे व जिल्हा पुढीलप्रमाणे सुहास चव्हाण (नंदुरबार), घनश्याम बळप (नाशिक ग्रामीण), मधुकर साळवे (जळगाव), हर्षवर्धन गवळी(धुळे), वासुदेव देसले (नंदूरबार), चंद्रशेखर यादव (धुळे),  संजय सानप (नाशिक ग्रामीण), विलास पुजारी(नाशिक ग्रामीण), सोपान शिरसाट (नाशिक ग्रामीण), शिवाजी डोईफोडे(नाशिक ग्रामीण).
जिल्ह्यात बदलून येणारे अधिकारी पुढील प्रमाणे खगेंद्र टेंभेकर, संदीप कोळी, समीर बारवकर, समाधान नागरे, रामकृष्ण कुंभार, नितीन देशमुख, आनंद कोकरे, सतीश घोटेकर, सोपान काकड.

 

Post a Comment

Previous Post Next Post