। अहमदनगर । दि.09 जानेवारी 2024 । मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या अनेक महिन्यांपासून लढा देत आहेत. मनोज जरांगे पाटील हे जालना जिल्ह्यातील त्यांच्या अंतरवाली सराटी या गावापासून 20 जानेवारी रोजी पदयात्रा काढणार आहेत. ही पदयात्रा जालना, बीड, आणि अहमदनगर जिल्ह्यातून पुणे मार्गे मुंबई येथे आझाद मैदानावर पोहोचणार असून मुंबई इथे आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसणार आहेत.
👉 मराठा आंदोलन आता आझाद मैदानावर
बीड जिल्ह्यातून ही पदयात्रा गेवराई मार्गे अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. पाथर्डी मार्गे ही पदयात्रा नगर शहरातून जाणार असून ज्यावेळी ही पदयात्रा नगर जिल्ह्यात येईल त्यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील संपूर्ण 14 तालुक्यातून मराठा बांधव अहमदनगर शहरात या पदयात्रेत सहभागी होणार आहेत तसेच या पदयात्रेत सहभागी झालेल्या लाखो मराठा बांधवांची सेवा करण्यासाठी सर्व 14 तालुक्यातून मराठा बांधव नगर शहरात उपस्थित राहणार असून त्यासाठी नगर शहरात आज सकल मराठा समाजाच्या वतीने नियोजनाची बैठक घेण्यात आली आहे .
👉 मराठा आंदोलन आता आझाद मैदानावर
कोहिनूर मंगल कार्यालयात ही बैठक पार पडली असून या बैठकीत नगर जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवांनी एकत्र येत जालना बीड आणि इतर जिल्ह्यातून या पदयात्रेत सहभागी होणाऱ्या बांधवांची सेवा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधील मराठा बांधवांनी एक लाख लोक जेवतील असे नियोजन हाती घेतले आहे. जेवण, राहण्याची सोय ,पाणी व इतर काही गोष्टींबाबत चर्चा करण्यात आली त्यासाठी स्वयंसेवकांवर जबाबदारी सोपवण्यात आली असून अनेक मराठा बांधव पुढे मुंबईकडे जाणाऱ्या या पदयात्रेत सामील होणार आहेत.
