स्वराज्याचे स्वप्न जिजाऊंनी अहमदनगर मध्येच पाहिले : इंजि. अभिजीत एकनाथ वाघ
राजमाता जिजाऊ जयंती निमित्त मराठा सेवा संघातर्फे अभिवादन
। अहमदनगर । दि.12 जानेवारी 2024 । जिजाऊंचे वडील लखुजी राजे जाधव व सासरे मालोजीराजे भोसले हे अहमदनगरच्या निजामशाहीत कार्यरत होते. त्यामुळे त्यांचे बालपण तसेच लग्नानंतरची बरीचशी वर्षे ही अहमदनगर शहरात गेली.असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे महानगर अध्यक्ष इंजि. अभिजित एकनाथ वाघ यांनी केले.
मराठा सेवा संघ व सकल भारतीय समाज तर्फे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय येथे साजरी करण्यात आली. यावेळी जिजाऊ व शहाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळाचे आसिफ दुलेखान, भैरवनाथ वाकळे,उर्जिता फाउंडेशनच्या संध्यामेढे, समृध्दी वाकळे, मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबिद दुलेखान, शफकत सय्यद, ठाकुरदास परदेशी,अमोल बास्कर,डॉ परवेज अशरफी, स्माईलींग अस्मिताचे यशवंत तोडमल,बाळासाहेब पवार निर्भय बनोचे दत्ता वडवणीकर, फिरोज शेख, रमेश म्हस्के, संतोष गायकवाड,सचिन डागा, शिवाजी शिंदे, चंदू माळी आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना वाघ म्हणाले की, नवीपेठ येथे मालोजी भोसले यांनी उभारलेले अमृतेश्वर मंदिर व त्या शेजारी असलेला वाडा हा मालोजी पॅलेस होता. पुढे त्या ठिकाणी नगर अर्बन बँक उभी राहिली.
वडील सासरे व पती शहाजीराजे हे निजामशाहीत कार्यरत असताना वारंवार होणारे मोगलांचे आक्रमण तसेच आदिलशाहीचे आक्रमण यामुळे प्रजा कशी सैरभैर होते हे सर्व जिजाऊंनी अहमदनगर वास्तव्यात जवळून पाहिले.
मलिक अंबर नंतर निजामशहाच्या लहान वंशजाला मांडीवर घेऊन मोगल व आदिलशहा यांच्याबरोबर लढताना शहाजीराजे यांची कसरत जिजाऊंनी जवळून पाहिली. त्यामुळे आता आपले राज्य असावे असे त्यांनी ठरविले. निजामशाहीचा अस्त झाला तेव्हा बाल शिवाजी सह जिजाऊ बेंगलोर येथे शहाजीराजां बरोबर गेल्या. तेथे शहाजीराजे व जिजाऊंनी बाल शिवाजीवर शैक्षणिक संस्कार पूर्ण करून येथे स्वतंत्र कारभार करण्यास पाठविले.
जिजाऊंनी निजामशाही जवळून पाहिल्याने राज्य उभे करायचे तर डोंगर दऱ्या याचा फायदा घेऊन करावे लागेल, त्यानुसार त्यांनी पूर्ण परिसरातील डोंगरी किल्ले ताब्यात घेऊन तेथे राज्यकारभार सुरू केला. त्यामुळे अहमदनगर येथील त्यांचे वास्तव्य फार महत्त्वाचे आहे.असे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यांनी केले. आभार यांनी मानले.
