राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार लोकमंथन चे सुधीर पवार यांना प्रदान


। अहमदनगर । दि.14 जानेवारी 2023 ।  स्व.पै.किसनराव डोंगरे बहूउद्देशीय संस्था आयोजित स्वामी विवेकानंद जयंती, राजमाता जिजाऊ जयंती व राष्ट्रीय युवा सप्ताह निमित्त दिला जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार दैनिक लोकमंथन चे जेष्ठ पत्रकार सुधीर पवार यांना देण्यात आला.

हे वाचा...जिल्ह्यातील दहा पोलीस निरीक्षकांची बदली! 

जिल्हा परिषदेचे माजी संचालक माधव लामखडे व महिला पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या हस्ते देण्यात आला. या वेळी जेष्ठ कवी चंद्रकांत पालवे, उद्योजक बाळासाहेब शहाणे, सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलिस उप निरीक्षक शामुवेल गायकवाड, जालिंदर बोरुडे, नाना डोंगरे, आदी उपस्थित होते. 

हे वाचा...‘सत्यशोधक’ मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा करातून सूट 

सुधीर पवार अहमदनगर मध्ये गेल्या 31 वर्षापासून अनेक स्थानिक वर्तमानपत्रातून काम केले.  तसेच नगर शहरात होणारे विविध राज्य स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम त्याठिकाणी ते आवर्जून उपस्थित असतात. पवार यांना मिळालेल्या पुरस्काराने त्यांचे विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे

हे वाचा...माळीवाडा येथील शंकरबाबा सावली मठातील दानपेटी चोरीस

Post a Comment

Previous Post Next Post