। अहमदनगर । दि. 12 जानेवारी 2023 । एसटी बस पुण्याला थांबते का? असे बस वाहकाला महिला प्रवासी विचारीत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन तिच्या पर्समधील 35 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले.
👉शाळा महाविद्यालय परिसरातील अतिक्रमण, अवैध धंद्यावर कारवाई
ही घटना नगर मधील स्वस्तिक चौकातील पुणे बसस्थानक येथे घडली. या बाबतची माहिती अशी की रुपाली रविंद्र देशपांडे (रा. समृध्दी लेकश्वर, फ्लॅट नं. 602,जांभूळवाडी रोड पुणे) यांना पुण्याला घरी जायचे असल्याने ते पुणे बस स्टॅण्ड येथे आल्या.
👉कांद्याची गोणी अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू
तिने तिच्या गळ्यातील 87 हजार 500 रुपये किंमतीचे 35 ग्रॅम वजनाचे सोन्याची चैन व सोन्याचे मणी आणि त्याला एक सोन्याचा पेन्डल असलेले मणी मंगळसुत्र लहान पर्स मध्ये ठेवुन ती पर्स मोठ्या पर्स मध्ये ठेवुन चैन लावली. त्यानी बसवाहक याकडे गाडीची चौकशी केली.
👉शिवसेनेकडून चांदणी चौकातील बंद सिग्नलला चपलांचा हार
त्यावेळेस कोणीतरी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन पर्समध्ये सोन्याचे दागिणे ठेवलेली लहान पर्स काढुन चोरुन नेली. या प्रकरणी रुपाली देशपांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अनोळखी इसमाविरुध्द चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली पुढील तपास पोलिस हवालदार सुर्यकांत डाके हे करीत आहेत.
