। अहमदनगर । दि.08 नोव्हेंबर 2023 । जिल्हा परिषदेतील सर्व विभागावर सीसीटीव्हीची करडी नजर आहे. परंतु एका विभागातील कक्षात सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नाही. नेमके याच कक्षाला सीसीटीव्हीच्या नजरेतून का वगळण्यात आले असा सवाल जिल्हा परिषद कर्मचार्यांमधून केला जात आहे.
जिल्हा परिषदेचे कर्मचारी कार्यालयात कमी चहाच्या ठेल्यावरच दिसतात जादा...
जिल्हा परिषदेतील सर्व विभागासह परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहे. या सीसीटीव्हीच्या माध्यमातून सर्वच ठिकाणी प्रशासनाची नजर रहात आहे. त्यामुळे इतर कुठल्या प्रकारच्या घटना कार्यालय परिसरात घडत नाही.
दिलीप वळसे पाटलांना निवडणुकीत धक्का
या सीसीटीव्हीचे लाईव्ह प्रेक्षपन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या दालनातील टीव्हीवर दिसत आहे.
वाहतुकीच्या नियमांची एैसीतैशी!
विशेष म्हनजे या सर्व सीसीटीव्हीचे नियंत्रण करणाऱ्या कक्षातच सीसीटीव्ही बसवण्यात आलेली नाही. प्रशासनाला विसर पडला की जाणूनबुजून बसवण्यात आले नाही. याबाबत कर्मचार्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.
राजस्थानमध्ये अतिरिक्त सचिवाच्या घरी ईडी!
या चर्चेची भनक सामान्य प्रशासनाला लागलेली आहे. परंतु त्यावर ठोस कारवाई या विभागाकडून अद्याप झालेली नाही. नेमका हाच विभाग कोणाच्या सांगण्यावरून वगळण्यात आला याची चर्चा कर्मचार्यांमध्ये सुरू आहे. या ठिकाणीही सीसीटीव्ही बसवण्यात यावी अशी मागणी कर्मचार्यांमधून होत आहे.
कै. दिलीप बद्रिनाथ शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन

