कै. दिलीप बद्रिनाथ शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन
। अहमदनगर । दि.03 नोव्हेंबर 2023 । शहरातील कल्याणरोड अनुसया नगर येथील दिलीप बद्रिनाथ शिंदे यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. ते कायनेटिक कंपनीत कार्यरत असताना त्यांनी युनियन अध्यक्ष म्हणून काम पाहिले.
याचबरोबर त्यांना सामाजिक कार्याची देखील आवड होती, त्यांनी विविध समाजातील मुलामुलींचे लग्न जमवण्याचे काम केले, हा त्यांचा छंद होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस म्हणून देखील त्यांनी काम केले.
व्यवसायात शिंदे उद्योग समूहाचे शिंदे कन्स्ट्रक्शन, महालक्ष्मी लॉन, शिंदे फिटनेसचे संचालक युवराज शिंदे यांचे ते वडील होते. तसेच राजेंद्र शिंदे ,शिवाजी शिंदे, पद्मा ठुबे, साधना सुपेकर यांचे ते मोठे बंधू होते, त्यांच्या पश्चात पत्नी, सून, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
----
💥 राजस्थानमध्ये अतिरिक्त सचिवाच्या घरी ईडी!
