जिल्हा परिषदेचे कर्मचारी कार्यालयात कमी चहाच्या ठेल्यावरच दिसतात जादा...


। अहमदनगर । दि.08 नोव्हेंबर 2023 । जिल्हा परिषदेत सध्या प्रशासक राज सुरू आहे. या प्रशासन काळात कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. अनेकदा काही अधिकारी व कर्मचारी जागेवर सापडत नाही. कार्यालयात कमी चहाच्या ठेल्यावरच कर्मचारी आढळून येत आहेत.

गेल्या पावनेदोन वर्षांपासून जिल्हा परिषदेत प्रशासक राज आहे. या प्रशासक राज काळात कामे गतीमान होण्याऐवजी अनेकांची कामे खोळंबली आहेत. पदाधिकारी असताना कामात अडथळे येतात अशी ओरड अधिकारी व कर्मचारी करीत होते. 

परंतु गेल्या पावनेदोन वर्षात पदाधिकारी नसताना विकास कामे वेगाने होण्याऐवजी खोळंबली आहेत. विशेष म्हनजे कार्यालयीन वेळेत कर्मचारी जागेवर रहात नसल्याचे स्पष्ट झालेले आहे. ही कर्मचारी सकाळी पावनेदहाला हजेरी लावल्यानंतर कामाला सुरवात करण्याअगोदर चहाच्या ठेल्यावर हजेरी लावत आहेत.

त्यानंतर कामाला सुरवात करीत आहेत. हे कर्मचारी कामावर कमी चहाच्या ठेल्यावरच जादा दिसून येत आहेत. त्यामुळे अनेकांची कामे खोळंबली जात आहे. याकडे सामान्य प्रशासनचे दुर्लक्ष झालेेेले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील कर्मचारी चहाच्या ठेल्यावर दिसून येत आहेत.


कार्यालयीन वेळेत दिवाळीची खरेदी
दिवाळीची धामधूम सुरू झालेली आहे. या धामधुमीत जिल्हा परिषदेतील काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत खरेदीसाठी तास न तास जात आहेत. विशेष म्हणजे साहित्य खरेदीकरून आणत आहेत. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालेला आहे. अशा कर्मचार्यांवर सामान्य प्रशासन विभाग कार्यवाही करील का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post