दिलीप वळसे पाटलांना निवडणुकीत धक्का


। पुणे । दि.06 नोव्हेंबर 2023 । राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निरगूसर गावात तसेच त्यांचा भीमशंकर सहकारी साखर कारखाना असलेल्या गावातील सत्ता त्यांच्या गटाच्या ताब्यातून गेली आहे. वळसे पाटील यांनी स्वतः प्रचार करूनही त्यांच्या गटाला सत्ता राखता आली नाही.

वळसे पाटील यांना यांच्या गावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  गटाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. त्याचवेळी परळीमध्ये पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडे यांनी जोरदार झटका दिला आहे. दुसरीकडे गिरीश महाजन यांनी मात्र त्यांच्य तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीवर एकहाती वर्चस्व मिळवले आहे. परळी तालुक्यातील तीन ग्रामपंचायती पूर्वी पंकजा मुंडे यांच्या ताब्यात होत्या. त्यापैकी दोन ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांना मिळाल्या आहेत.  

वळसे पाटील यांना शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांच्याच गावात धक्का दिला आहे. निरगुडसर गावात झालेल्या चुरशीच्या झालेल्या सरपंचपदासाठी शिंदे गटाचे रवी वळसे १३५ मतांनी विजयी झाले आहे. या ठिकाणी एकूण १३ पैकी तीन सदस्य शिंदे गटाचे तर दहा सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय झाले. 

स्वतःच्या गावात दिलीप वळसे पाटील यांनी प्रचार करूनही त्यांचा संतोष टावरे हा सरपंच पदाचा उमेदवार पराभूत झाला आहे. वळसे पाटील यांच्या राजकारणाचे केंद्रस्थान असलेला भीमाशंकर सहकारी साखर कारखाना ज्या पारगाव गावामधे आहे, त्या पारगावमधे वळसे यांच्या गटाचा सरपंचपदाच्या उमेदवार अर्चना ढोबळे पराभूत झाल्या आहेत.  तिथे  शरद पवार गटाच्या श्वेता ढोबळे या सरपंच झाल्या आहे.

Post a Comment

Previous Post Next Post