वाहतुकीच्या नियमांची एैसीतैशी!
। कोतवाली पोलिसांकडून दोन दिवसांत 47 हजारांचा दंड वसूल
। अहमदनगर । दि.03 नोव्हेंबर 2023 । वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनचालकांच्या विरोधात कोतवाली पोलिसांनी पुन्हा कारवाईचा सपाटा लावला आहे. गत दोन दिवसांत 21 वाहनांकडून 48 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
वाहनचालकास लुटले ; दोघे अटकेत
शहरातील माळीवाडा, सक्कर चौक, इम्पिरीअल चौक, कोठी चौक, जीपीओ चौकात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. गत काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यात आंदोलने सुरू आहेत. आंदोलनकर्त्यांनी आक्रमक होत एसटी बसेसची जाळपोळ सुरू केली. त्यामुळे जिल्ह्यातून लांबपल्ल्याच्या बसच्या फेर्या बंद करण्यात आल्या.
कै. दिलीप बद्रिनाथ शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन
मात्र, ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पोलिसांच्या देखरेखीखाली एसटी बसेस सोडण्यात आल्या. मात्र, एसटी बसेस बंद असल्याचा फायदा घेण्यासाठी काही प्रवासी वाहतूक करणार्यांनी अवाच्या सव्वा भाडे वसुली केली. अशा प्रकारे भाडेवसुली करणार्यांच्याविरोधातही कारवाई केली गेली.
अनिता काळे यांचा रोटरी क्लबच्या नगररत्न पुरस्काराने गौरव
वाहतुकीच्या नियमांना तिलांजली देणार्यांची बिल्कुल गय केली जाणार नाही, असे पोनि यादव यांनी सांगितले. वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करणार्यांवर 500 रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंत दंड करण्यात आला आहे.
