मार्केटयार्ड मागील गोडाऊन फोडून 57 हजाराच्या साहित्याची चोरी


 । अहमदनगर । दि.25 नोव्हेंबर 2023 । गोडाऊनच्या शटरचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला आतील सामानाची उचकापाचक करुन आतील 57 हजार रुपये किमतीचे ट्रॅक्टरचे व ट्रॉलीचे  स्पेअर पार्ट चोरुन नेले.ही घटना मार्केट यार्ड मागील भवानी नगर चाहुराणा बुद्रुक येथील गोडाऊन मध्ये झाली.

जिल्हा परिषदेतील ‘तो’ विभाग कॅमेराविनाच!  

या बाबतची माहिती अशी की मनोज हिरालाल कुंकूलोळ (रा.त्रिमुर्ती किराणा दुकानासमोर, गणेशचौक, सिव्हील हडको, अहमदनगर) यांचे मार्केट यार्ड मध्ये सिध्द ट्रेडर्स या नावाने ट्रॅक्टरचे ट्रॉलीचे पार्टसचे दुकान आहे.

वाहतुकीच्या नियमांची एैसीतैशी! 

त्यांच्या भवानीनगर चाहुराणा बुद्रुक येथील गोडावुनचे शटरचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने आतील 6 हजार रुपये किमतीचे 20 नांगर बार , 25 हजार रुपये किमतीचे 10 ट्रॉली डिस्क, 10 हजार रुपये किमतीचे 100 हायड्रोलीक पाईप, 5 हजार रुपये किमतीचे 50 ऑईल सील,4 हजार रुपये किमतीचे 10 ट्रॉलीचे पाठे,7 हजार रुपये किमतीचे 200 ट्रॅक्टर ट्रॉलीचे हब बोल्ट असे एकूण 57 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरुन नेली.

क्षीरसागर कुटुंबीयांकडून ब्रिटिश कालीन तलवार ... 

या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी मनोज कुंकूलोळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली.पुढील तपास पोलिस हवालदार वाघ हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post