क्षीरसागर कुटुंबीयांकडून ब्रिटिश कालीन तलवार ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाला भेट

क्षीरसागर कुटुंबीयांकडून ब्रिटिश कालीन तलवार ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाला भेट

बडोदा संस्थानच्या महाराजांनी सन्मानपूर्वक अण्णासाहेब क्षीरसागर यांना तलवार देऊन केला होता गौरव

। अहमदनगर । दि.03 नोव्हेंबर 2023 । ब्रिटिश कालीन पोलीस सब इन्स्पेक्टर स्व. अण्णासाहेब श्रीधर क्षीरसागर यांना बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी सन्मानपूर्व प्रदान केलेली तलवार क्षीरसागर कुटुंबीयांनी अहमदनगर ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय व संशोधन केंद्राकडे सुपूर्द केली.

अनिता काळे यांचा रोटरी क्लबच्या नगररत्न पुरस्काराने गौरव

ऐतिहासिक ठेवा असलेल्या तलवारीचे योग्यप्रकारे जतन होण्याच्या उद्देशाने व हा इतिहास नागरिकांपर्यंत जाण्याच्या हेतूने क्षीरसागर परिवाराने वस्तुसंग्रहालयाचे विश्‍वस्त डॉ. रवींद्र साताळकर व अभिरक्षक डॉ. संतोष यादव यांच्याकडे अण्णासाहेब क्षीरसागर यांची तलवार व त्यांची प्रतिमा भेट दिली. यावेळी सुधाकर क्षीरसागर, मनोहर क्षीरसागर, मालिनी गाडेकर, रोहिणी क्षीरसागर, पुष्पा क्षीरसागर आदींसह बेलापूर बदगी (ता. अकोला) येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

राजस्थानमध्ये अतिरिक्त सचिवाच्या घरी ईडी !

बडोदा (गुजरात) संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी सन 1936-37 मध्ये पोलीस सब इन्स्पेक्टर स्व. अण्णासाहेब श्रीधर क्षीरसागर यांनी रेल्वे पोलीस मध्ये उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल त्यांचा ब्रिटिश कालीन तलवार देऊन सन्मान केला होता. या तलवारीच्या मुठ जवळ चांदीचे छोटे नाणे आहे. 

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव 

तर पूर्वी त्या तलवारीच्या टोकाला दक्षिण आफ्रिकेच्या जंगलातील विष लावलेले होते. या तलवारीने झालेली जखम कोणत्याही औषध व मलमने भरुन निघत नव्हती. ही तलवार सहाणवर घासून त्याचा मलम बनविल्यास त्या तलवारीने झालेली जखम भरुन निघते असे हे या तलवारीचे वैशिष्टये होते, अशी माहिती सुधाकर क्षीरसागर यांनी दिली.

राजकीय नेत्यांना गावबंदी...

डॉ. रवींद्र साताळकर म्हणाले की, नागरिकांकडे आपल्या कुटुंबातील ऐतिहासिक दुर्मिळ वस्तुंचा ठेवा असल्यास ते ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाला दिल्यास त्याचे योग्य प्रकारे जतन होणार आहे. तर त्या गोष्टीशी जुडलेला इतिहास देखील भावी पिढी पर्यंत जाऊ शकणार आहे. यासाठी नागरिकांनी आपल्याकडील ऐतिहासिक दुर्मिळ वस्तुंचा ठेवा वस्तुसंग्रहालयास देण्याचे त्यांनी आवाहन केले.

कॉलेजसमोर असलेल्या हुक्का पार्लरवर छापा 

Post a Comment

Previous Post Next Post