। अहमदनगर । दि.25 नोव्हेंबर 2023 । पिंपळगाव माळवी तलाव आणि परिसरात असलेल्या महापालिकेच्या मालकीच्या सुमारे 700 एकर जमिनीची मोजणी व हद्दनिश्चितीच्या कामास शुक्रवारी (दि.24) रोजी सकाळपासून सुरु करण्यात आले. पिंपळगाव माळवी व जेऊर हद्दीतील या संपूर्ण जमिनीची मोजणी करुन हद्द निश्चित करुन खुणा दाखविण्यात येणार असून पुढील दोन ते तिन दिवस हे काम चालणार असल्याची माहिती मिळाली आहे.
पिंपळगाव माळवी तलावाच्या भरावाखाली सुमारे 150 एकर व जेऊर हद्दीत सुमारे 550 एकर जमीन महापालिकेच्या मालकीची आहे. या जमिनीच्या मोजणी व हद्दनिश्चितीच्या खुणा करण्यासंदर्भात भूमिअभिलेख कार्यालयाने महापालिका तसेच दोन गावातील जमिनीलगतच्या शेतकर्यांना 17 नोव्हेंबर रोजी नोटीस जारी केल्या होत्या. त्यानुसार 24 नोव्हेंबर रोजी संबंधितांनी मोजणीस्थळी हजर राहण्याचे सूचित करण्यात आले होते.
त्यानुसार शुक्रवारी (दि.24) सकाळी भूमिअभिलेख कार्यालयाचे राम बोरुडे व वैकर महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक नगररचनाकार विभागाचे सहाय्यक नगररचनाकार वैभव जोशी, सर्व्हेअर अखिल पठाण, बाळू व्यापारी, अतिक्रमण विरोधी पथकाचे रिजवान शेख, उपअभियंता अदित्य बल्लाळ, यांच्या संयु3त पथकाने संबंधित ठिकाणी शेतकर्यांच्या उपस्थितीत जमिनीची हद्दनिश्चित आणि खुणा दाखविण्याच्या कामास सुरवात केली आहे.
