। अहमदनगर । दि.29 ऑगस्ट 2023 । बोल्हेगाव परिसरात बालाजी नगर शेजारी असलेल्या एका ज्वलरी दुकानामधून 25 हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या पट्ट्या महिलांनी लक्ष विचलीत करुन चोरुन नेल्या आहेत. याप्रकरणी तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस निरीक्षक यादव यांचा गौरव
मिळालेली माहिती अशी की, दि.14 ऑगस्ट रोजी सकाळी 11 च्या सुमारास दोन अज्ञात महिला बालाजी नगर येथील एका ज्वलरीच्या दुकानात आल्या त्यांनी दुकानात येवून पायातील चांदीच्या पट्टया दाखवा असे म्हणुन चांदीच्या पट्टया पाहण्यासाठी मागितल्या.
माळीवाडा बसस्थानकातून महिलेच्या दागिन्यांची चोरी
यानंतर ज्वलरीच्या मालकाची नजर चुकवून लबाडीच्या इराद्याने 25 हजाराच्या चांदीच्या पट्टया चोरुन नेल्या. याप्रकरणी तोफखाना पोलिसा ठाण्यात दोन महिलाविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास स फौ शेख हे करीत आहे.
Tags:
Crime
