। अहमदनगर । दि.27 ऑगस्ट 2023 । एमआयडीसी परिसरातील दुध डेअरी चौक, सावकार कापड दुकानाचे शटरचे लॉक पट्ट्या तोडून दुकानाच्या आत प्रवेश करुन 55 हजाराचा माल अज्ञाताने चोरुन नेला. याबबाबत एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, चोरट्यांनी दुकानातील माल यामध्ये अरमानी पॅट, शर्ट, जिन्स, चप्पल असा दुकाना मधील जवळापास 55 हजाराचा माल चोरुन नेला आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसात राहुल भिमराज सातपुते (वय 22 वर्षे धंदा व्यवसाय रा.वडगाव गुप्ता) यांनी दिलेल्या माहितीवरुन अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती राहुल सातपुते यांनी पोलिसांना दिली. चोरीची माहिती दिल्यानंतर प्रभारी अधिकारी सपोनि सानप यांनी भेट दिली असून या गुन्हयाचा पुढील तपास अंमलदार पोहेकॉ टेमकर हे करत आहे.
Tags:
Crime
