। अहमदनगर । दि.28 ऑगस्ट 2023 । शहरातील माळीवाडा बसस्थानकात प्रवासी महिलेच्या बॅग मधील पर्समध्ये ठेवलेले दीड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
चोरी गेलेली बोअरचे गाड़ी तामिळनाडू येथून नेवासा पोलीसांनी केली जप्त
या बाबत प्रार्थना दीपक माने ( वय 21, रा. दौंड, जि. पुणे ) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रार्थना माने या एस.टी. ने प्रवास करत असताना माळीवाडा बसस्थानकावर थांबलेल्या होत्या.
दुकानाच्या शटरचे लॉक तोडून चोरट्यांचा डल्ला
त्यावेळी तेथे गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या जवळील बॅग मधील पर्स चोरुन नेली. या पर्समध्ये 4 तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, कानातील झुमके तसेच 1 अंगठी असे 1 लाख 53 हजार रुपये किंमतीचे दागीने चोरुन नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग नोंदवावा
या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि.क. 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस नाईक थोरात करीत आहे.
अनधिकृत लॉटरी, बोगस विक्रेत्यांवर कडक कारवाई करणार : उपमुख्यमंत्री
