। अहमदनगर । दि. 29 ऑगस्ट 2023 । नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील यांच्या हस्ते पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
पो.नि. चंद्रशेखर यादव यांनी गुन्हेगारी कृत्य करणार्यांवर कारवाई करण्याबरोबरच लोकाभिमुख कार्यक्रम घेऊन जनसामान्यांमध्ये पोलिस दलाबद्दल आपुलकीची भावना निर्माण केली आहे.
याच कामाची पावती म्हणून विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांनी चंद्रशेखर यादव यांना अहमदनगर जिल्हा पोलिस क्रीडा स्पर्धेच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी इतर अधिकारी आणि पोलिस अंमलदार यांच्याबरोबर सन्मानपत्र देऊन गौरव केला.
यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे आणि स्वाती भोर तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी आणि अ.नगर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याचे ठाणेदार आणि पोलिस अंमलदार उपस्थित होते.
Tags:
Ahmednagar
