सोन्याचे आमिष दाखवून दरोडा टाकणारी टोळी 24 तासात एलसीबीकडून गजाआड


। अहमदनगर । दि.29 ऑगस्ट 2023 । नगर तालुक्यातील आरणगांव येथे स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवुन दरोडा घालणार्‍या टोळीस अवघ्या 24 तासांत अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. सदर ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडुन एकुण 1 लाख 65 हजार 530/-रुपये किंमतीचा त्यामध्ये सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल, मोसा इत्यादी मुद्देमाल हस्तगत करुन जप्त करण्यात आला आहे.

उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस निरीक्षक यादव यांचा गौरव

मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी भरत चयन नरवडे (वय 27 वर्ष, रा. धनगर पिंप्री ता.अंबड जि.जालना) यांना विजय नावाच्या व्यक्तीने फोन करुन स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवुन निर्जनस्थळी नगर दौंड रोडवरील रेल्वे ट्रॅकजवळ अरणगांव ता.जि.अहमदनगर येथे बोलावुन घेऊन सदर विजय नावाच्या व्यक्तीने व त्याचे साथीदार चार अनोळखी पुरुष व एक महिला अशांनी फिर्यादी व साक्षीदार यांना लाथाबुक्यांनी मारहाण करुन बळजबरीने त्याचेकडील पाकीट, रोख रक्कम व सोन्याचे दागिने धमकी देऊन एकुण 60 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. या घटनेबाबत नगर तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं 395,420,323,506 प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बोल्हेगावातून चांदीच्या पट्टयांची चोरी

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोनि दिनेश आहेर यांना ना उघड चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करुन गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन गुन्हा उघडकिस आणणेबाबत आदेशित केले होते. नमुद आदेशान्वये पोनि दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि हेमंत थोरात, पोहेकॉ बबन विठ्ठल मखरे, पोहेकॉ संदिप कचरु पवार, पोना ज्ञानेेशर नामदेव शिंदे, पोना लक्ष्मण चिंधु खोकले,पोना रविंद्र कर्डीले, पोना मेघराज कोल्हे, पोना फुरकान शेख, पोना प्रशांत राठोड, पोना संतोष शंकर लोढे, पोना विशाल अशोक दळवी, मपोकॉ सोनाली शिवाजी साठे, पोकॉ रविंद्र तुकाराम घुंगासे, पोकॉ मच्छिंद्र छबु बर्डे, पोकॉ अमोल पोपट कोतकर, पोकॉ भाऊसाहेब काळे, पोकॉ बाळु सुभाष खेडकर, पोकॉ अमृत शिवाजी आढाव तसेच चालक पोकॉ अरुण भिमराव मोरे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन करुन सुचना दिल्याने पथक सदर गुन्हयाचा समांतर तपास करत असताना पोनि दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, 

माळीवाडा बसस्थानकातून महिलेच्या दागिन्यांची चोरी

सदरचा गुन्हा हा रेकॉर्ड वरील आरोपी नामे विजय गजाजन काळे, रा. दहिगाव साकत, ता.जि.अहमदनगर याने त्याचे साथीदारांसह केला असुन तो त्याचे साथीदारांसह तांबे मळा, बुरुडगाव, ता.जि.अहमदनगर येथील रेल्वेपटरीचे पुला खाली येणारे असल्याबाबत माहिती मिळाल्याने इसम विजय गजाजन काळे, रा. दहिगाव साकत, ता.जि.अहमदनगर याचा सदर ठिकाणी जावुन शोध घेतला असता बातमीतील वर्णनाप्रमाणे सदर इसम व त्याचे साथीदार एक पुरुष व एक महिला यांचेसह दिसुन आल्याने त्यांच्याकडे जात असतांना त्यांना चाहुल लागल्याने पळुन जावुन लागले.तेव्हा पथकाने मोठ्या शिताफीने पाठलाग करुन पकडले. विजय जालिंदर चव्हाण, (वय 26 वर्षे, रा.तांबेमळा, व्ही. आर.डी.ई. जवळ, ता.जि.अहमदनगर), विजय गजाजन काळे, (वय 26 वर्षे, रा.दहिगाव साकत, ता.जि.अहमदनगर), तसेच महिला नामे पाणकोर, जालिंदर चव्हाण (वय 42 वर्षे, रा.तांबेमळा, व्ही.आर. डी.ई. जवळ, ता.जि.अहमदनगर) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. दगु बडोद भोसले,(रा.पडेगाव, ता.कोपरगाव हल्ली रा.वाळकी, ता.जि.अहमदनगर), मितवान ज्ञानदेव चव्हाण, (रा.बुरुडगाव, ता.जि.अहमदनगर), अजय गजानन काळे (रा.दहिगाव ता.जि.अहमदनगर) यांचेसह सदर गुन्हा केल्याचे तयंनी सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post