। अहमदनगर । दि.08 जुलै 2023 । मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने चोरून नेले. बालिकाश्रम रस्त्यावर गायकवाड मळा परिसरात बुधवारी (दि. 5) सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
एमआयडीसीतील वर्कशॉपमधून ऑईल चोरणारा ताब्यात
या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रिती सोपान गाडेकर (रा. कवडेनगर, बालिकाश्रम रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. त्या येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात परिचारिका म्हणून नोकरीला आहे.
कायनेटिक चौकातील कारंजात मालट्रक घुसला
त्या बुधवारी सकाळी सव्वा सहा वाजता मॉर्किंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्या गायकवाड मळा परिसरात असताना दुचाकीवरून आलेल्या अंदाजे 40 ते 42 वर्षीय इसमाने त्यांच्या गळ्यातील 16 ग्रॅमचे सोन्याचे गंठण ओरबडून धूम ठोकली.
आणखी एक मोठ्या नेत्याने सोडली उध्दव ठाकरे यांची साथ
त्यांनी आरडाओरडा केला असता स्थानिक नागरिक जमा झाले. तो पर्यंत चोरटा दुचाकीवरून पसार झाला. प्रिती गाडेकर यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरटा सीसीटिव्ही कॅमेर्यात कैद झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
बसस्थानक परिसरात चोऱ्या करणारी टोळी उघडकीस
